शाळेची बाल्कनी कोसळल्याने 40 विद्यार्थी जखमी झाल्याची घटना उत्तर प्रदेशातील बाराबंकीमध्ये घटना घडली. जखमींपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. अवध अकादमी शाळेत ही दुर्दैवी घटना घडली. जखमी विद्यार्थ्यांवर जिल्हा रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.
सकाळच्या सत्रात शाळा सुरू असताना अनेक विद्यार्थी बाल्कनीत उभे होते. बाल्कनीचा ढाचा कमकुवत झाल्याने विद्यार्थ्यांच्या वजनामुळे बाल्कनी कोसळली. यावेळी बाल्कनीत उभी असलेले विद्यार्थीही खाली कोसळल्याने जखमी झाले.
शाळेची बाल्कनी कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.