अनेकांना झोपेत विचित्र स्वप्न पडतात. कधी झोपेतच आपण पडलो तर किंवा कधी शौचालयातून साप बाहेर आला तर असे अनेक विचार मनात येतात. अशा घटना कधीच सत्यात घडलेल्या आपण पाहिल्या नसतील. मात्र थायलंडमध्ये एक अशीच घटना घडली आहे. एका तरुणाला 12 फूट लांबीचा अजगर त्याच्या घरातील शौचालयात आढळून आला. या तरुणाने अजगराशी झालेल्या झटापटीची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. या घटनेने स्थानिकांना फक्त धक्काच बसला नाही तर सोशल मीडियावरही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
समुत प्राकण भागात ही घटना घडली असल्याचे वृत्त आहे. ठानट थांगटेवानन नावाचा हा तरुण त्याच्या रोजच्या वेळी शौचालयासाठी गेला होता. यावेळी तो टॉयलेट सीटवर बससा असता टॉयलेटमधून एक भला मोठा अजगर बाहेर आला अन् अचानक त्याच्यावर हल्ला केला. हा अजगर तब्बल 12 फूटांचा होता. या 12 फूट लांबीच्या अजगराने तरुणाच्या गुप्तांगाला दौंश केले. त्यामुळे त्याला तीव्र वेदना झाल्या आहेत. त्यामुळे तो तेथून तातडीने उठला टॉयलेटकडे पाहिलं तर काय त्याच्या टॉयलेट सीटच्या आत एक मोठा अजगर असल्याचं थानाटच्या लक्षात आलं.
दरम्यान, अशा परिस्थितीतही ठानटने संयम व धैर्य दाखवले. त्याने लगेच अजगराचे तोंड पकडून कमोडबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी अजगराने त्याच्या हातावर अनेक ठिकाणी चावा घेतला. मात्र ठानटने हार न मानता त्या अजगराला मारण्याचा प्रयत्न केला. या चकमकीत अजगराला मारण्यात ठाणटला यश आले. अशी माहिती ठानटने त्याच्या पोस्टमध्ये सांगितल आहे.
ठानटच्या शौचालयात आठळणारा अजगर हा विषारी नसल्यामुळे त्याला फार कमी त्रास सहन करावा लागला. या घटनेनंतर ठानटने रुग्णालयात जाऊन शस्त्रक्रिया करून आवश्यक इंजेक्शन्स घेतली. यानंतर ते घरी परतले आणि परिस्थिती सामान्य झाली. दरम्यान या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या व्हिडिओमध्ये, शौचालयात रक्त विखुरलेले असताना ठानटने अजगराचे तोंड घट्ट धरलेले दिसत आहे. मात्र या घटनेने साऱ्यांचच लक्ष वेधून घेतले आहे.