दिल्ली उत्पादन शुल्क धोरण घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आजही न्यायालयातून जामीन मिळाला नाही. सीबीआयने आणखी वेळ मागितला आहे. त्यानंतर न्यायालयाने सुनावणी 5 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली. या जामीन अर्जावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र, CBI ने केजरीवाल यांच्या जामीनाला विरोध केला होता.
सीबीआय आज न्यायालयात उत्तर दाखल करणार आहे. यापूर्वी गेल्या सुनावणीत न्यायालयाने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना जामीन देण्यास नकार दिला होता. 14 ऑगस्ट रोजी न्यायालयाने सीबीआयला नोटीस बजावून उत्तर देण्यास सांगितले होते. आज तपास यंत्रणा न्यायालयात उत्तर दाखल करणार आहे.