3 विशेष फेऱ्यांनंतरही हजारो विद्यार्थी प्रवेशाविना

अकरावी ऑनलाइन प्रवेशाची विशेष फेरी 3 जाहीर झाली असून या फेरीनंतरही हजारो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. या विद्यार्थ्यांसाठी लवकरच पुढील प्रवेशाच्या सूचना अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या वेबसाईटवर जाहीर केल्या जाणार आहेत. दरम्यान तिसऱ्या विशेष फेरीत 13 हजार 145 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. विशेष फेरी 3 साठी एकूण 1 लाख 8 हजार 939 जागा उपलब्ध होत्या, तर या फेरीसाठी 17 हजार 488 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यामुळे अर्ज केलेल्या 4343 विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेश मिळालेला नाही. या फेरीत 8684 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे काॅलेज अलॉट झाले आहे. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना काॅलेजमध्ये जाऊन प्रवेश घेण्यासाठी उद्या, 23 ऑगस्ट सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुदत आहे.