पुण्यातील दौंडमध्ये एका शिक्षकाने नववीतील विद्यार्थिनीला अश्लील व्हिडीओ दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या नराधमाने आणखी काही विद्यार्थिनींचेही लैंगिक शोषण केल्याचे उघड झाले आहे. मळद येथे भैरवनाथ विद्यालयात हा धक्कादायक प्रकार घडला असून बापूसाहेब धुमाळ असे आरोपीचे नाव आहे. धुमाळ हा व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल करून तसेच अश्लील फोटो काढून विद्यार्थिनीना ब्लॅकमेल करायचा व त्यांच्यावर अत्याचार करायचा. दरम्यान, या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी शाळेवर धडक देत शाळा बंद केली.