महापालिका मुख्यालय 40 मिनिटे अंधारात

 

मुंबई महानगपालिकेच्या मुख्यालय इमारतीच्या फिडरमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्याने मुंबई महापालिका मुख्यालयाचा वीजपुरवठा आज सायंकाळी तब्बल 40 मिनिटे बंद झाला. यामुळे मुख्यालयात कर्मचाऱयांची तारांबळ उडाली. पालिका मुख्यालयाला बेस्टकडून वीजपुरवठा होतो. गुरुवारी रात्री 7.14 मिनिटांच्या दरम्यान बत्ती गुल झाल्याने मुख्यालयात अंधार पसरला. नियमित वीजपुरवठा खंडित झाल्याने तेथे जनरेटरच्याद्वारे होणाऱया वीजपुरवठय़ात अत्यावश्यक कामे सुरू होती. रात्री 7 वाजून 54 मिनिटांनी पुन्हा वीज पुरवठा सुरू झाला. याबाबत बेस्टच्या अधिकाऱयांना विचारणा केली असता त्यांच्याकडून फिडरमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्याने वीजपुरवठा खंडित झाल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.