दहावी-बारावी फेरपरीक्षेचा आज निकाल 

दहावी, बारावी फेरपरीक्षेचा निकाल उद्या 23 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे. www.mahresult.nic.in व www.mahahsscboard.in या वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. ऑनलाइन निकालानंतर लगेचच दुसऱया दिवसापासून गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी विभागीय मंडळाकडे ऑनलाइन www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी 24 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल, त्यासोबतच शुल्कदेखील भरता येईल.