ऑस्ट्रेलियानंतर टीम इंडिया इंग्लंडसोबत खेळणार 5 टेस्ट, वाचा मालिकेचे संपूर्ण शेड्यूल

हिंदुस्थानचा संघ पुढच्या वर्षी 2025 मध्ये जून-ऑगस्टच्या दरन्याम इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यामध्ये टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध 5 कसोटी सामने खेळणार आहे. या दौऱ्यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली असून आज (22 ऑगस्ट) भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) ने पाच कसोटी सामन्यांचे वेळापत्रक जाहिर केले आहे.

BCCI आणि ECB यांनी जाहिर केलेल्या वेळापत्रकानुसार टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये पहिला कसोटी सामन्याला हेडिंग्ले इथून 20 जून पासून सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर दुसरा कसोटी सामना 2 जुलै रोजी बर्मिंघम इथे खेळवला जाईल. तर तिसरा कसोटी सामना 10 जुलै रोजी लॉर्ड्सवर, चौथा कसोटी सामना 23 जुलै मॅंचेस्टर आणि पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना 31 जुलै रोजी ओव्हलमध्ये खेळवला जाईल.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (WTC) तिसऱ्या हंगामाची फायनल जून 2025 मध्ये मक्का, लॉर्ड्समध्ये खेळवली जाणार आहे. मात्र टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये होणारी ही कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या चौथ्या हंगामाचा भाग असणार आहे.