Chandrapur सात महिन्यात जिल्ह्यात अत्याचाराच्या 102 घटना

राज्यात लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून यंदा जुलै अखेरीपर्यंत चंद्रपूर पोलिसांनी 102 गुन्हे नोंदवले आहेत. गेल्यावर्षी 75 गुन्ह्यांची नोंद झाली होती. मागील वर्षी पेक्षा यावर्षात अधिक घटना घडल्या आहेत. पॉस्कोच्या 73, अत्याचाराच्या 29 आणि विनयभंगाचे 153 घटना सात महिन्यात घडल्या आहेत. अशा घटना घडू नये यासाठी चंद्रपूर पोलिसांकडून शाळा महाविद्यालयात जनजागृती करण्यात येत असल्याचा चंद्रपूर पोलीस अधीक्षक सूदर्शन मुमक्का यांनी सांगितलं.