सकल मराठा आंदोलकांनी अडवला मुख्यमंत्री शिंदेचा ताफा

eknath-shinde

मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकानी बुधवारी अहमदपूरमध्ये रात्री 9 च्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा आडवला. यावेळी आंदोलकांनी एक मराठा, लाख मराठा अशा घोषणा देत लवकर आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली.

मुख्यमंत्री शिंदे आज परळी येथे धनजंय मुंडे यांनी आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाच्या उद्धघाटनासाठी आले होते. हा कार्यक्रम संपल्यानंतर ते मुंबईकडे निघाले असता अहमदपूरमध्ये मराठा आंदोलकांनी त्यांचा ताफा अडवत घोषणाबाजी केली.

दरम्यान वर्षभरापासून राज्यात मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ओबीसीतून आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन सुरू आहे.