हिंदुस्थानसाठी अभिमानास्पद कामगिरी तसेच दूरदर्शी नेतृत्वाची दखल घेऊन जागतिक पातळीवरील ‘हेराल्ड ग्लोबल अॅण्ड ईआरटीसी मीडिया’द्वारे दिल्या जाणाऱया प्रतिष्ठsच्या ‘प्राईड ऑफ इंडिया आयकाॅन 2024’ या पुरस्कारासाठी शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत यांची निवड झाली आहे. मुंबईत आयोजित सोहळय़ात अरविंद सावंत यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हिंदुस्थानच्या अभिमानाला मूर्त रूप देणाऱया प्रतिष्ठत नेत्यांचा सन्मान करण्यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. देशाला अभिमानास्पद कामगिरी, कर्तव्यासाठी वचनबद्धता, देशाच्या समृद्ध वारसाचे प्रतिबिंब आणि अर्थव्यवस्थेवरील परिवर्तनात्मक प्रभाव अशा क्षेत्रांतील विविध कामगिरीची दखल घेऊन खासदार अरविंद सावंत यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
आयटीसी मराठा येथे आज आयोजित केलेल्या ‘गोलफेस्ट काॅन्क्लेव्ह 2024’ या सोहळय़ामध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळय़ात महाराष्ट्र चेंबर ऑफ का@मर्स, इंडस्ट्रीज अॅण्ड ऑग्रिकल्चर अध्यक्ष ललित गांधी, बॉम्बे बार असोसिएशन अध्यक्ष नितीन ठक्कर यांनाही सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर चित्रपट, उद्योग, संगीत अशा क्षेत्रातील यशस्वी प्रतिभावंतांचाही सत्कार करण्यात आला. ‘हेराल्ड ग्लोबल’चे मुख्य संपादक सैमिक सेन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. हिंदुस्थानातील यशस्वी ब्रॅण्ड्स आणि विविध क्षेत्रांतील यशस्वी नेत्यांची ओळख करून देणाऱया का@फी टेबल बुकच्या सोळाव्या आवृत्तीचे यानिमित्ताने प्रकाशनही करण्यात आले. ‘हेराल्ड ग्लोबल’ संस्थेने यापूर्वी थायलंड, दुबई, मलेशिया, सिंगापूर, लंडन आदी देशांत अनेक कार्यक्रम यशस्वी केले आहेत.
उद्धव ठाकरे यांच्याकडून अभिनंदन
आंतरराष्ट्रीय पातळीवरील या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदार अरविंद सावंत यांचे अभिनंदन केले.