राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने सन 2023 साठीचा राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना तर चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना प्रदान करण्यात आला. वरळी येथील एनएससीआय डोम येथे हा सोहळा रंगला.
स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक, संकलक एन. चंद्रा आणि चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार लेखक, दिग्दर्शक तसेच अभिनेता दिग्पाल लांजेकर यांना मिळाला. सांस्पृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार आणि चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरवचे स्वरूप रुपये 10 लाख, मानपत्र व मानचिन्ह असे आहे. स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्काराचे स्वरूप रुपये 6 लाख, मानपत्र व मानचिन्ह असे आहे.
अनुराधा पौडवाल यांना लता मंगेशकर पुरस्कार
राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. संगीत व गायन क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल 2024 चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना प्रदान करण्यात आला. चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना गौरविण्यात आले. पंठसंगीत प्रकारातील पुरस्कार सुदेश भोसले यांना प्रदान करण्यात आला.