बदलापूरमध्ये दोन चिमुरडय़ांवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर न्यायासाठी जनतेला सत्यावर उतरून आंदोलन करावे लागले, तेव्हा न्याय देण्यासाठी पहिले पाऊल उचलले गेले. आता गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलन करावे लागणार का? न्यायासाठी पोलिस ठाण्यापर्यंत जाणेही इतके कठीण का होऊन बसले आहे, असा सवाल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारला केला आहे.
न्याय देण्यापेक्षा अधिक प्रयत्न गुन्हा लपवण्यासाठी केला जातो. याला महिला आणि कमजोर वर्गातील लोक बळी पडतात. गुन्हा दाखल न होण्यामुळे पीडित हतबल होतात आणि गुन्हेगारांना अधिक प्रोत्साहन मिळते. त्यामुळे महिलांना, लेकींना सुरक्षित वातावरण देण्यासाठी सर्व सरकारे, नागरिक आणि राजकीय पक्षांना गंभीरपणे विचारमंथन करावे लागणार आहे. असे मतही राहुल गांधी यांनी एक्सद्वारे मांडले आहे.पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि बिहारनंतर आता महाराष्ट्रातही लेकाRविरोधात अतिशय घृणास्पद गुन्हे घडत आहेत. एक समाज म्हणून आपण कुठे जात आहोत याबद्दल विचार करणे आता आपल्याला भाग पडले आहे, अशी प्रतिक्रीया राहुल गांधी यांनी एक्सवरून दिली आहे. न्याय हा पोलिस आणि प्रशासनाच्या मर्जीचा गुलाम नसून तो प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.