शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून केंद्र सरकारने पवारांना झेड प्लस सुरक्षा दिली आहे. यामुळे आता सीआरपीएफकडे पवार यांच्या सुरक्षेची धुरा असणार आहे.

शरद पवार यांच्या सुरक्षेत आजपासूनच वाढ करण्यात आली असून दहा कमांडो शरद पवार यांच्यासोबत असणार आहेत. सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी बेलार्ड पीयर येथील कार्यालयात आज शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना झेड प्लस सुरक्षेबाबत अवगत केले. दरम्यान, झेड प्लस ही देशातील सुरक्षेची सर्वोच्च श्रेणी मानली जाते.