नाशिक, घोटी, ईगतपुरी व धरण कार्यक्षेत्रात तब्बल 14 दिवसांच्या विश्रांतीनंतर तिसऱ्या श्रावणी सोमवारी पावसाने पुन्हा बरसायला सुरुवात केली. दारणा धरणात 89.65 टक्के पाणी साठा झाला. तर भाम, भावली, वाकी, वालदेवी, आळंदी ही धरणे पुर्णपणे भरली आहेत. 1जुन पासुन 81 दिवसांत नांदुर-मध्यमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीतुन 2 लाख 8 हजार 592 क्युसेक्स म्हणजेच 18 हजार 29 दशलक्ष घनफुट 18 टीएमसी पाणी जायकवाडीकडे गेले आहे. 19 ऑगस्ट रोजी झालेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे मिलीमिटरमध्ये तर कंसातील आकडे एकुण पावसाचे आहेत.
दारणा २ (८६२), मुकणे ० (९७५), वाकी २४ (१६३९), भाम १० (२२४७), भावली १३ (२८६९), वालदेवी १४ (६६०), गंगापुर ३७ (१०५७), काश्यपी २३ (९३५), गौतमी ७ (१०८८), कडवा २६ (४८९), आळंदी ११ (६५५), पालखेड २(२२४), करंजवण ७ (६६४), ओझरखेड २ (५६४), वाघाड ६ (६३३), नांदुर मध्यमेश्वर ३(२३३), नाशिक ४४ (६२७), घोटी ३५ (१३३८), ईगतपुरी २३ (२२७०), त्रंबकेश्वर ५(१५४२), देवगांव २६ (३५१), ब्राम्हणगांव ५ (३२९), कोपरगांव १३(२८९), पढेगांव ० (२८२), सोमठाणे (२०९), कोळगांव ० (२९३), सोनेवाडी (१९६), शिर्डी ८ (२७८), राहाता ४ (२१७), रांजणगांव खुर्द ९ (२४२), चितळी ११(२७४), याप्रमाणे पाउस झाला आहे. धरणांतील पाणीसाठा टक्के, तर कंसातील आकडे उपलब्ध पाणी दशलक्ष घनफुटमध्ये पुढीलप्रमाणे.दारणा ८९ टक्के (६४०९ दलघफु), मुकणे ६१ टक्के (४४७६) वाकी ८२ टक्के (२०६६), भाम १०० टक्के (२४६४), भावली १०० टक्के, (१४३४), वालदेवी १०० टक्के (११३३), गंगापुर ८७ टक्के (४९४३), काश्यपी ६३ टक्के (११७०), गौतमी ९१ टक्के (१७०५), कडवा ८३ टक्के (१४०५), आळंदी १००टक्के (८१६), पालखेड ५५ टक्के (३६४), करंजवण ७० टक्के, (३७७१), असा पाणीसाठा आहे.
तिसऱ्या श्रावणी सोमवारी कोपरगांव तालुक्यात पुर्णपणे ढगाळ पावसाळी वातावरण होते. भाविकांनी महादेवाच्या दर्शनासाठी व गोदास्नानासाठी मोठी गर्दी केली होती. वैजापुर व संभाजीनगर तसेच येवला तालुक्यातील भाविकांनी कावडीद्वारे महादेवाला पवित्र गोदाजल नेण्यांसाठी गर्दी केली होती.