
महिलेला ब्लॅकमेल करत तिच्यावर अत्याचार झाल्याची घटना जामखेडमध्ये घडली आहे. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तू माझ्यासोबत चल, तू माझ्यासोबत राहा, अन्यथा मी तुझ्यासोबतचे व्हाट्सअप व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करेल, अशी धमकी महिलेला देण्यात आली. त्या महिलेला मारहाण करत तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी एका व्यक्तीविरोधात जामखेड पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोज भगवान अब्दुले (वय 40, रा. सदाफुले वस्ती ,जामखेड) याची मे 2024 रोजी पिडीत महीलेसोबत ओळख झाली होती. त्यामुळे आरोपी आणि महीलेचे फोनवर बोलणे होत होते. त्यानंतर काही महीन्यांनी अब्दुले पिडीत महीलेला आपण लग्न करु आसे म्हणत होता. मात्र महीलेचे पुर्वी लग्न झाले होते. ती सहा महिन्यांपासून आपल्या वडील व भावाकडे रहात होती. तसेच तिचा पहील्या पतीपासून घटस्फोट झाला नव्हता. त्यामुळे पिडीत महीलेने आरोपीसोबत लग्न करणास नकार दिला.
महिलेने नकार दिल्यानंतरही अनेकदा मनोज अब्दुले पिडीत महीलेकला भेटत लग्न करण्यासाठी तिचे मन वळवण्याचा प्रयत्न करत होता. जुलै महिन्यात त्याने दोन वेळा पिडीत महीलेवर तिची इच्छा नसताना बळजबरीने अत्याचार केला. त्यानंतर तो महिलेला रस्त्यातच अडवत तू माझ्या सोबत चल, असे म्हणाला. तिने नकार देताच त्याने शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच तू माझ्यासोबत आली नाही तर मी तुझ्यासोबत व्हीडिओ कॉल वर बोललेलो कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करुन तुझी बदनामी करेल, अशी धमकी दिली. त्याने व्हॉटसप व्हीडिओ कॉल रेकॉर्डींग पिडीत महीलेच्या भावाला पाठवत तिची बदनामी केली. या प्रकरणी दि 18 जुलै रोजी पिडीत महीलेने जामखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी मनोज अब्दुले याच्या विरोधात जामखेड पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील हे करत आहेत.