गेल्या काही महिन्यांमध्ये कोलकाता, उरण, नवी मुंबई आणि बदलापूर या शहरांमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनांमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. बदलापूरमध्ये काल (20 ऑगस्ट 2024) जवळपास 10 तास रेल्वेसेवा संतप्त नागरिकांनी ठप्प करत आरोपीला तत्काळा फाशी द्या अशा घोषणा केल्या. मात्र हिंदुस्थानात दोषींना तत्काळ फाशी देणे शक्य नाही. तसेच गुन्हा सिद्ध झाल्यास दोषींना फाशीची शिक्षा सुनावली जाते. परंतु जगभरात असे काही देश आहेत. त्या देशांमध्ये दोषींना भयंकर शिक्षा सुनावली जाते.
देशभरातील विविध भागांमध्ये दररोज बलात्कार आणि छेडछाडीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातवरण आहे. अशा परिस्थितीमध्ये दोषींना तत्काळ सर्वांच्या समोर फाशी देण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. परंतु हिंदुस्थानात ते शक्य नाही. मात्र जगभरात अशा गंभीर गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षा सुनावली जाते. उत्तर कोरियामध्ये बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये दोषी आढळलेल्या नराधमाला लष्कर थेट गोळ्या घालून ठार मारते. तसेच सौदी अरबमध्ये सर्वांच्या समोर दोषींचा शिरच्छेद केला जातो. चीनमध्ये बलात्कारीला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली जाते. तसेच काही प्रकरणांमध्ये दोषींचे गुप्तांग कापण्याची शिक्षा दिली जाते. ईराकमध्ये बलात्कारीला दगडाने ठेचूण मारण्याची शिक्षा दिली जाते.