…तर 17 सप्टेंबरनंतर मोदी आपलं पंतप्रधान पद गमावून बसतील; भाजपच्या बड्या नेत्याचा इशारा

भाजपची 2014 मध्ये जेव्हा सत्ता आली त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वयाची पंचहात्तरी ओलांडलेल्या नेत्यांना मंत्रीमंडळात स्थान दिले नव्हते. त्यामुळे लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती हे बडे नेते राजकारणातून बाजूला गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या 17 सप्टेंबरला 75 वर्षांचे होणर आहेत. त्यामुळे आता मोदी राजकारणातून बाहेर होणार की नाही असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यावरून भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदींना एक इशारा दिला आहे.

”मोदींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारकाच्या संस्कारांवर कायम राहत 17 सप्टेंबर रोजी आपल्या 75 व्या जन्मदिनानंतर मार्गदर्शन वर्गातून (मार्गदर्शन मंडल) सेवा निवृत्तीची घोषणा केली नाही तर ते अन्य मार्गानं आपलं पंतप्रधान पद गमावून बसतील”, असा इशारा सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदींना दिला आहे.