रंगभूमीच्या रंगात न्हाऊन निघालेले पंढरीनाथ आहेत ते… निक्की – जान्हवीच्या वक्तव्यावर संतापली विशाखा सुभेदार

बिग बॉस मराठीचं पाचव पर्व दिवसेंदिवस रोमांचक होत आहे. या पर्वातील स्पर्धक जान्हवी आणि निक्की या दोघींवर अनेकदा प्रेक्षक नाराज झाल्याचे पाहायला मिळाले. आता पुन्हा एकदा जान्हवी किल्लेकरच्या वक्तव्यामुळे प्रेक्षकच नाही तर काही कलाकार देखील नाराज झाले आहेत.

जान्हवी किल्लेकरने पंढरीनाथ कांबळेना उद्देशून आयुष्यभर ओव्हरअॅक्टिंग करुन करुन दमले, आता तिचं ओव्हरअॅक्टिंग घरात दाखवत आहेत, असे म्हटले. याविषयी सुप्रसिद्ध अभिनेत्री व पंढरीनाथ कांबळेंची मैत्रीण विशाखा सुभेदार यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकत संताप व्यक्त केला आहे.

या पोस्टमध्ये निक्की आणि जान्हवी या दोघींनी पॅडीवर केलेल्या वक्तव्याला उद्देशून आपले अश्रू लपवून लोकांचं मनोरंजन करतो, त्यांना हसवतो. तो म्हणजे जोकर. हे काम बाप जन्मात तुम्हाला जमणार नाही. त्यासाठी हिम्मत लागते, ती तुमच्याकडे नाही. उथळ पाण्याला खळखळाट खूप. हे विधान निक्की आणि जान्हवी साठी एकदम परफेक्ट आहे. जान्हवी तुझ्यासारखे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले पंढरीनाथ नाही ते… गेली अनेक वर्ष रंगभूमीच्या रंगात न्हाऊन निघालेले पंढरीनाथ आहेत ते…! आणि त्यांच्या विनोदाचा टाइमिंग याबद्दल तर तू बोलायचंस नाही. नखाची किंमत नाहीय तुला” असे म्हणत विशाखा सुभेदारने संताप व्यक्त केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vishakha Subhedar (@subhedarvishakha)

पुढे त्यांनी लिहिले आहे की, “विनोदा मुळे तो माणूस जगलाय, टिकलाय, 50 शी पूर्ण झालीय त्याची तरीही आजही स्लॅपस्टिकचा बाप आहे तो..शांत आहे ह्याचा अर्थ अस नाहीये कीं त्याल सेल्फ respect नाहीये..!
आता थोडं पॅडी बद्दल..
पॅडी माऊली🙏 तूझा खेळ तू खुप सभ्यपणे, हुशारीने, संयम बाळगून खेळतोयस मित्रा…! आता तर तू जोरात आलायस..!
इतका हिडीस बोलल्यानंतर ही तुझ्या तोंडून वाईट शब्द निघत नाहीयत त्याबद्दल तुला सलाम… खचून जाऊ नकोस…! टास्क मध्ये जोर लावून खेळ मित्रा..!
तू वयाने मोठा आहेसच आणि शिवाय माणूस म्हणून मोठा आहेस हे दाखवून दिलस आज.
एक उत्तम reactor असूनही तू रिऍक्ट झाला नाहीस त्याबद्दल तुझे खुप खुप कौतुक…!
बाकी तुझ्या फळांनी मज्जा आणली. काय timing भन्नाट.
निकीच्या अंगणात तू जाणारच नाहीस हे तू बरं नाही करत.. खरंतर जां रोज जां.. आणि तीचे वाळत घातले पापड असतील नां त्याच्यावर नाच. तिच्या आवाजासारखाच आवाज येईल त्या पापडा चा…!
करियर वर बोलायच नाही….” असे म्हटसे आहे.