गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह आज सकाळी नाल्यात आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पांढरकवडा तालुक्यातील एका गावातील ही 15 वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्यापासून तिचे कुटुंबीय शोध घेत होते.
मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसातही याबाबत माहिती दिली होती. गावालगत असलेल्या नाल्यावर सकाळी मासे पकडण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला तिचा मृतदेह नाल्याच्या पाण्यात तरंगताना आढळून आला. त्याने लगेचच या प्रकरणी पोलिसांना माहिती दिली. तिने आत्महत्या केली की काही घातपात आहे याचा पोलीस शोध घेत आहेत.