मुद्दा – पिस्ता आणि आरोग्यदायी फायदे

गेल्या  काही वर्षांमध्ये सर्वच स्वतःचे आरोग्य व स्वास्थ्याला अधिक प्राधान्य देऊ लागले आहेत. त्यामुळे अर्थपूर्ण राहणीमानामध्ये वाढ होत आहे. यासंदर्भात संतुलित आहार महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचे पाहता आपण सेवन करत असलेल्या अन्नामधील पौष्टिक घटकांबाबत जाणून घेण्यामध्ये वाढ झाली आहे. ‘तुम्ही जसे खाणार तसे तुमचे आरोग्य असणार’ या वाक्याशी बांधील राहत व्यक्ती स्मार्टपणे आहार निवडी करत आहेत आणि दैनंदिन आहारामध्ये पौष्टिक पदार्थ असण्याची खात्री घेत आहेत.

हे ग्रीन नट्स स्वादिष्ट ऑन-द-गो स्नॅक आहे, ज्यामध्ये ऍण्टिऑक्सिडण्ट्स, प्रथिने आणि उत्तम पौष्टिक घटक आहेत.  ज्याबाबत बहुतेकांना माहीत नाही. अमेरिकेतील आरडी कॅथरिन सॅबेस्टियन यांच्या मते पिस्त्याच्या सेवनाचे पुढीलप्रमाणे फायदे आहेत.  पिस्ता नैसर्गिकरीत्या कोलेस्ट्रॉलमुक्त आहे आणि हृदयासाठी आरोग्यदायी फूड आहे. यूएस एफडीएच्या मते, वैज्ञानिक पुराव्यामधून निदर्शनास येते, पण सिद्ध होत नाही की, दररोज सॅच्युरेटेड (संतृप्त) फॅट व कोलेस्ट्रॉल कमी असलेल्या आहाराचा भाग म्हणून पिस्त्यासारख्या 1.5 औंस नट्सचे सेवन केल्याने हृदयसंबंधित आजाराचा धोका कमी होऊ शकतो. फळे किंवा क्रॅकर्ससोबत मिक्स केले असता किंवा दैनंदिन आहारासोबत क्रंची पर्याय म्हणून वापरल्यास पिस्ता उत्तम आहे.

पिस्ता परिपूर्ण प्रथिन स्रोत आहे. ज्यामध्ये सर्व नऊ आवश्यक ऍमिनो ऍसिड्स आहेत. आपले शरीर हे ऍमिनो ऍसिड्स निर्माण करू शकत नाही. ज्यामुळे शरीराच्या योग्य कार्यासाठी आहारामधून हे ऍमिनो ऍसिड्स मिळणे आवश्यक आहे. जलद स्नॅक म्हणून दैनंदिन आहारामध्ये वनस्पतीआधारित प्रथिन पिस्ताचा समावेश करणे उत्तम आहे, ज्यामुळे तुम्हाला दीर्घकाळापर्यंत पोट भरल्यासारखे वाटेल. तसेच त्यामधून फायबर व अनसॅच्युरेटेड (असंतृप्त) फॅट्स देते. हे स्वादिष्ट नट्स क्रंची स्वाद देण्यासोबत प्रथिने दैनंदिन शक्तिवर्धक आहारामध्ये भर करतात. पिस्ता अनेकदा डिसर्ट टॉपिंग, स्वतंत्र स्नॅक म्हणून किंवा एनर्जी-बूस्टिंग ट्रेल मिक्समध्ये घटक म्हणून वापरले जाते.

पिस्त्यामध्ये प्रति सर्व्हिंग 3 ग्रॅम फायबर असते. कुरकुरीतपणा व स्वादासाठी स्टिर-फ्राइजमध्ये पिस्ताचा समावेश केल्यास स्वादिष्टपणासोबत पौष्टिकतेची खात्री मिळते.

पिस्त्यामध्ये प्रथिने, फायबर आणि अनसॅच्युरेटेड फॅट्स असतात. या तिन्ही पौष्टिक घटकांमुळे तुम्हाला दीर्घकाळापर्यंत पोट भरल्यासारखे वाटू शकते. जवळपास 49 नट्सच्या एका सर्व्हिंगमध्ये (1 औंस/ 28 ग्रॅम) 160 कॅलरीज असतात. डार्क चॉकलेट चिप्ससोबत पिस्ताचे मिश्रण केल्यास गोड, स्वादिष्ट व वजन नियंत्रण ठेवणारे स्नॅक पर्याय मिळते. आरोग्यदायी आहाराचा भाग म्हणून पिस्ता स्वादिष्ट व पौष्टिक आहारासाठी सलाड्समध्ये समाविष्ट करता येऊ शकतात.

पिस्तामध्ये 30 विभिन्न व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि पौष्टिक घटक असतात. पिस्तावरील ग्रीन्स व पर्पल्स या लहान स्नॅकमधील ऍण्टिऑक्सिडण्ट्सचे व्हिज्युअल संकेत आहेत. पिस्ता दहीसोबत सेवन करता येऊ शकते, ज्यामुळे उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा मिळण्यास मदत होते किंवा दिवसभरातील ऊर्जेसाठी दैनंदिन स्मुदीजमध्ये समाविष्ट करता येऊ शकतात.