बदलापूर शहरातील आदर्श शाळेत चार वर्षांच्या दोन मुलींवर अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. मंगळवारी या घटनेविरोधात संतप्त बदलापूरकरांनी रेल्वे रुळांवर उतरून आंदोलन केले आहे. गेल्या सहा-सात तांसांपासून मध्य रेल्वेची बदलापूरवरून जाणारी लोकलसेवा ठप्प असून आंदोलकांचं रौद्ररुप अनुभवायला मिळत आहे. आता या घटनेवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून ट्विट केले असून या प्रकरणातील तीन पोलिस अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती दिली.
बदलापूरच्या घटनेत सुरुवातीला कारवाई करण्यात तसेच गुन्हा नोंदवण्यास विलंब करणारे बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दिले असल्याचे देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
बदलापूरच्या घटनेत प्रारंभीच्या काळात कारवाईत विलंब करणारे बदलापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis यांनी ठाणे पोलिस आयुक्तांना दिले आहेत. #Badlapur
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) August 20, 2024
ट्विटमध्ये लिहीले आहे की, बदलापूरच्या घटनेत प्रारंभीच्या काळात कारवाईत विलंब करणारे बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे पोलिस आयुक्तांना दिले आहेत.