कोलकाता येथील आर जी कर रुग्णालयातील डॉक्टर तरुणीचा बलात्कार करुन तिची निर्घृणपणे हत्या केली, याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी हो या प्रकरणावर आता न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. न्यायालयाने डॉक्टरांच्या सुरक्षेवर नॅशनल टास्क फोर्स तयार करणार असल्याचे जाहीर केले. न्यायालयाच्या देखरेखी खाली हा टास्क फोर्स तयार केला जाणार असून त्यात डॉक्टरांचाही समावेश करण्यात येणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्यायमूर्ती जेबी पारदीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. डॉक्टरांच्या आंदोलनामुळे पश्चिम बंगालमधील आरोग्य व्यवस्था ठप्प पडली आहे. डॉक्टरांच्या संघटना देशभर आंदोलन करत आहेत. बंगालचे राज्यपाल सीवी आनंद बोस दिल्लीला पोहोचले असून मंगळवारी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांची भेट घेणार आहेत.
सोमवारी तपास यंत्रणेने आर जी कर मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. संदीप घोष यांची 13 तास कसून चौकशी केली. त्यांची आज पुन्हा चौकशी केली जाणार आहे. आरोपी संजय रॉय याची पॉलीग्राम टेस्ट केली जाणार आहे. सीबीआयला न्यायालयाकडून मंजूरी मिळाली आहे. पॉलिग्रामने टेस्टने आरोपी किती खरे आणि खोटे बोलतोय हे कळेल. तसेच तपास यंत्रणा आरोपीचे मानसिक चाचणी केली आहे. आता सीबीआय, माजी प्राचार्य डॉ.संदीप घोष यांची पॉलीग्राम टेस्ट करू इच्छित आहे.