रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेनिमित्त शहरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते. भावाबहिणीच्या नात्यातील बंध अधिक दृढ करण्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. यानिमित्त बहिणींनी आपल्या लाडक्या भाऊरायाच्या मनगटावर राखी बांधत आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन त्याच्याकडून घेतले. दुसरीकडे जुहू, वेसावे, मढ, खारदांडा, वरळी, कुलाबा येथील कोळी बांधवांनी पारंपरिक वेशभूषा करत मिरवणूक काढत समुद्राला नारळ अर्पण केला. शहरात ठिकठिकाणी नारळ फोडोफोडी स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते.
शिवसेना शाखा क्रमांक 203 तर्फे आयोजित नारळ फोडाफोडी स्पर्धेत शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत यांनीदेखील सहभाग घेतला. या वेळी माजी नगरसेविका सिंधू मसुरकर, शाखाप्रमुख मिनार नाटळकर, शाखा संघटक भारती पेडणेकर, शाखा समन्वयक दिव्या बडवे उपस्थित होते.
शिवसेना शाखा क्रमांक 118तर्फे आमदार सुनील राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली नारळ फोडाफोडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. शिवसेना उपनेते दत्ता दळवी, विधानसभा संघटक वंदना बेंद्रे, सुनीता साळवे, श्रद्धा मुरकर यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन शाखा समन्वयक योगेश दळवी यांनी केले.
शिवसेना वरळी विधानसभा आणि वरळी सागरी कोळी महोत्सव समितीतर्फे आयोजित नारळ फोडाफोडी स्पर्धेला विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, उपनेत्या किशोरी पेडणेकर, बाळा खोपडे, जिवबा केसरकर, संकेत सावंत, आकर्षिक पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन युवासेना उपविभाग अधिकारी अभिजीत पाटील यांनी केले होते.
शिवसेना, कांजूर पूर्व येथील श्री साई वंदना चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित नारळ फोडाफोडी स्पर्धेतील विजेते अक्षय सावंत यांना आमदार सुनील राऊत यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. उपविभागप्रमुख अनंत पाताडे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला बाबा कदम, सिद्धी जाधव, रवींद्र महाडिक उपस्थित होते.
माहीम युवासेनाच्या वतीने नारळ फोडाफोडी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात 81 वर्षीय हर्षचंद्र ठाकूर यांना सोन्याचे नाणे जिंकण्याचा मान मिळाला. बक्षीस वितरण समारंभाला विभागप्रमुख महेश सावंत, उमेश महाले, रणजीत कदम, गुर्शिन कौर आणि स्वप्नील सूर्यवंशी उपस्थित होते.