
इस्रायल-गाझा यांच्यातील युद्ध पूर्णपणे संपुष्टात आणण्याची जबाबदारी अमेरिकेने परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांच्यावर सोपवली आहे. ते इस्रायलमध्ये दाखल झाले असून त्यांनी इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष इसाक हरझोग यांची भेट घेतली.
इस्रायलने युद्धविरामाचा प्रस्ताव स्वीकारला असून हमासकडून अद्याप प्रतिसाद मिळणे बाकी आहे, असे ब्लिंकन म्हणाले. लवकरच ते इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांची घेट घेणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी गाझा युद्ध पूर्णपणे थांबवण्यासाठी आपल्याला पाठवल्याचे ब्लिंकन म्हणाले. दरम्यान, या वेळी कोणताही तणाव निर्माण होणार नाही, कुणीही प्रक्षोभक कारवाई करणार नाही याची आम्ही काळजी घेऊ, असेही ते म्हणाले.