प्रसिद्ध डान्सर गौतमी पाटील हिच्यावर दाखल असलेल्या एका गुन्ह्यात ती आज नगरच्या न्यायालयामध्ये वेशभूषा बदलून हजर झाली. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर गौतमी पाटीलला अटी व शर्तींवर जामीन मंजूर केला आहे.
गौतमी पाटील नगरच्या जिल्हा न्यायालयात आज हजर झाली. गेल्या वर्षी गणपती विसर्जनादिवशी पाईपलाईन रोडवर गौतमीचा कार्यक्रम झाला होता. आयोजकांनी विनापरवानगी कार्यक्रम घेत नियमांचे उल्लंघन केले होते. या संदर्भात पोलिसांच्या फिर्यादीवरून गौतमी पाटीलवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. न्यायालयाने अटी आणि शर्तींनुसार जामीन मंजूर केला आहे.
गणपती उत्सवकाळात नगर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तरीही आयोजकांनी कार्यक्रम घेतला. या प्रकरणासंदर्भामध्ये येथील तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये आयोजकांसह गौतमी पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार कोर्टात हजर राहणे अनिवार्य होते. त्यामुळे गौतमी आज कोर्टात हजर झाली. न्यायमूर्तींनी तिची बाजू एकून घेत तिला अटी-शर्तींच्या आधारावर जामीन मंजूर केला.