12 टक्के हिंदुस्थानी मसाले खाण्यास अयोग्य

देशात विकल्या जाणाऱ्या मसाल्यातील 12 टक्के मसाले हे खाण्याच्या लायकीचे नाहीत. फूड्स सेफ्टी अँड स्टँडर्ड अॅथोरिटी ऑफ इंडिया (एफएसएसएआय) ने 4054 मसाल्यांच्या नमुन्यांची तपासणी केली. यामध्ये 474 नमुने हे खाणे योग्य नसल्याचे समोर आले आहे. मे ते जुलै यादरम्यान करण्यात आलेल्या तपासणीची माहिती आरटीई अंतर्गत विचारण्यात आली होती.

एप्रिल-मे 2024 मध्ये सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये मसाल्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आल्यानंतर आणि त्यावर बंदी घालण्याच्या मागणीनंतर एफएसएसएआयने या मसाल्यांची गुणवत्ता चाचणी केली होती. ज्या मसाल्यांची चाचणी करण्यात आली. त्या मसाल्यांचा ब्रँड नुसार माहिती उपलब्ध करण्यात आली नाही. परंतु, जो ब्रँड गुणवत्ता चाचणीत अयशस्वी झाला आहे. त्या कंपनीविरोधात कारवाई करण्यात येत आहे, असे फूड्स सेफ्टी अँड स्टँडर्ड अॅथोरिटी ऑफ इंडियाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.