अखेर महापालिकेनं आम्ही आणलेली योजना स्वीकारली, आदित्य ठाकरेंची खणखणीत पोस्ट

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे सरकार असताना कालाघोडा पादचारी मार्गाची संकल्पनेला महापालिकेने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे आता काळाघोडा हे आता शनिवार व रविवारी संध्याकाळी मुंबईतील पहिले वाहनमुक्त पादचारी क्षेत्र होणार आहे. त्याबाबत आदित्य ठाकरे यांनी एक पोस्ट शेअर करत या निर्णयाचे स्वागत केले आहे. ”अखेर मुंबई महापालिकेनं आम्ही आणलेली योजना स्वीकारली ते पाहून मला आनंद झाला असं आदित्य ठाकरे यांनी आपल्या X पोस्ट मध्ये म्हंटलं आहे.

अखेर काळा घोडा पादचारी प्रकल्प सुरू झाला आहे, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी सांगितलं की, आमचे सरकार असताना पर्यटन मंत्री म्हणून मी कोविड नंतर महाबळेश्वरच्या मार्केट स्ट्रीटवर जे (सुशोभिकरण आणि पर्यटनासंदर्भात) करत होतो त्या धर्तीवर मुंबई महापालिकेला हे प्रस्तावित केलं होतं. दुर्दैवानं या सरकारने ‘आढाव्या’च्या नावाखाली काम बंद पाडलं होतं. आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे की कल्पना अतिशय सोपी होती, आठवड्याच्या शेवटी विशिष्ट वेळेसाठी रस्ता फक्त पादचारींसाठी उपलब्ध ठेवा. तो रस्ता आणि त्यासाठीची वेळ निश्चित असेल आणि या निश्चित वेळात दुकाने आणि रेस्टॉरंटना मोकळेपणाणे आपली दुकानं मांडता येतील.(मुंबई महापालिकेने दिलेल्या वेळात परवानगी दिलेल्या वेळेत). मला आशा आहे की मुंबई महापालिकेने निश्चित केलेल्या नियम आणि शुल्कांसह विशिष्ट दिवशी रेस्टॉरंट सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात येईल.”, असे ट्विट केले आहे.

तसेच निवडणूक आयोगाने मिंधे सरकारला जो काही अधिक काळ दिला आहे. त्यात ते सर्व स्थानिक भागधारकांना सोबत घेऊन, महाबळेश्वर मार्केट पुनरुज्जीवन योजना पुन्हा चालू करतील, असे आदित्य ठाकरे म्हणाले.