शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिव वाहतूक सेनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. शिव वाहतूक सेनेच्या अध्यक्षपदी उपनेते भाऊ कोरगावकर यांची तर सरचिटणीसपदी नीलेश भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्याध्यक्षपदी संदीप (बाबू) मोरे, कोषाध्यक्षपदी विनायक मुरूडकर, उपाध्यक्षपदी साजिद सुपारीवाला, नरेश चाळके, शाम बिस्ट यांची तर सचिवपदी अमिरुद्दीन तालुकदार, विशाल आमकर, संदेश शिरसाट, उमर शरीफ सिद्दीकी यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.