मुंबईत हर्नियाचे प्रमाण 20 टक्क्यांनी वाढले असून दहापैकी 4 तरुणांना हर्नियाचा त्रास उद्भवत आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. अयोग्य पद्धतीने व्यायाम करणे हे यामागचे मुख्य कारण आहे.
आकर्षक दिसण्यासाठी तरुणाईमध्ये जिमचे फॅड वाढत आहे. खासकरून 25 ते 35 या वयोगटातील तरुण वेटलिफ्टिंग अर्थात अधिक वजन उचलण्याचा व्यायाम करतात जे त्यांच्यासाठी महागडे ठरतेय. आरोग्याबाबत जागरुक तरुण नियमितपणे जिममध्ये व्यायाम करतात, अशा तरुणांमध्ये ही समस्या अधिक दिसून येतेय.
अशी घ्या काळजी
जिममध्ये क्षमतेपेक्षा अधिक वजन उचलल्यामुळे तरुणाईत हर्नियाचे प्रमाण वाढतेय. त्यामुळे क्षमतेपेक्षा जड वजन उचलणे टाळा, तज्ञांच्या देखरेखीखाली व्यायाम करा, व्यायामापूर्वी वॉर्मअप करावा, वजन उचलताना वेळ घ्या, कंबरेचा बेल्ट वापरा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.