अरे व्वा… केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागणार लॉटरी, आठवा वेतन आयोग लागू झाल्यास पगार वाढणार

केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आठवा वेतन लागू झाल्यास त्यांना लॉटरीच लागणार आहे. हा आयोग लागू झाल्यास पगारात भरघोस वाढ होणार आहे. त्यामुळे हा आयोग कधी गठीत होतो आणि त्याच्या शिफारसी कधी लागू होतात याची उत्सुकता आहे.

प्रत्येक दहा वर्षांनी नव्या आयोगाची स्थापना केली जाते. त्यानंतर या आयोगाच्या शिफारसींनुसार केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा पगार वाढवला जातो. त्यामुळेच आता सर्वांना आठव्या वेतन आयोगाची प्रतीक्षा आहे. 1 जानेवारी 2026 सालापासून आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होण्याची शक्यता आहे. हा आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात तसेच पेन्शनमध्ये वाढ होणार आहे. दरम्यान, सरकारने अद्याप आठव्या वेतन आयोगाबाबत अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी संघटनांची मागणी मान्य केल्यास कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 18 हजार रुपयांहून थेट 34,560 रुपये होईल तसेच किमान पेन्शन 17,280 रुपयांपर्यंत पोहोचू शकते.

अनेकदा मागणी केली

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी आठवा वेतन आयोग गठीत करावा अशी मागणी केंद्र सरकारकडे अनेकदा केली. अर्थसंकल्पानंतर आठव्या वेतन आयोगाबाबत वित्त सचिव टी. व्ही. सोमनाथन यांना विचारले होते. त्यावर बोलताना आठवा वेतन आयोग लागू करण्यासाठी आमच्याकडे बराच वेळ आहे, असे सोमनाथन यांनी सांगितले होते.