विरोधकांवर सूडाचं राजकारण सुरुच आहे. हे राजकारण किती खालच्या पातळीला गेले याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांच्या मुलांच्या शाळेच्या खर्चाची चौकशी ल लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून (ACB) कडून लावण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
अकोल्यातील शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांच्या मुलांच्या शाळेवर किती खर्च झाला हे जाणून घेण्यासाठी चक्क एसीबीमार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसे पत्र एसीबीने शाळेला दिले आहे.
नितीन देशमुख यांच्या विरोधात काहीच सापडत नसल्यामुळे आता त्यांच्या आठवीत शिकणाऱ्या मुलीचा आणि दहावीत शिकणाऱ्या मुलाच्या शालेय शिक्षणावर किती खर्च झाला याची चौकशी एसीबीकडून केली जात आहे. देशमुख यांची मुलं शिकत असलेल्या प्रभात किड्स या शाळेला तसे पत्र पाठवण्यात आलं आहे. यात देशमुख यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी किती खर्च झाला याचा तपशील शाळेच्या मुख्याध्यापक आणि संचालकांकडून मागवला आहे.
काही दिवसांपूर्वी नितीन देशमुख गाडीमध्ये किती डिझेल-पेट्रोल भरतात? याचीही विचारपूस पेट्रोलपंप चालकांकडे काही अधिकाऱ्यांनी केली होती.