आमदार नवाब मलिक हे अजित पवार यांच्या बैठकीत उपस्थित होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच नवाब मलिकांची मी बाजू घेतली होती असेही सुळे म्हणाल्या.
2023 साली अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडली, तेव्हा नवाब मलिक तुरुंगात होते. त्यानंतर जामिनावर मलिक यांची सुटका झाली. पण मलिक कुठल्या गटात आहेत हे कळाले नाही. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनावेळी मलिक अजित पवार गटाच्या सत्ताधारी बाकांवर नवाब मलिक बसले होते. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांना महायुतीत जागा नाही अशी भुमिका घेतली होती.
📍शिंदखेडा, धुळे ⏭️ 18-08-2024
➡️ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष – महिला मेळाव्यातून लाईव्ह
https://t.co/T2lMSMI7BI— Supriya Sule (@supriya_sule) August 18, 2024
आता नवाब मलिक यांनी अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीत मलिक यांनी हजेरी लावली. यावर सुप्रिया सुळे यांनी आश्चर्य व्यक्त केलं. सुळे म्हणाल्या की भाजप सोयीप्रमाणे नातं जोडतं, दहशतवादी म्हणत भाजपने मलिकांना दूर केलं होतं, तेव्हा मी मलिक यांची बाजू घेतली होती. फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहून मलिकांना महायुतीत स्थान नाही असे स्पष्ट केले होते. सोयीप्रमाणे नाती जोडायची आणि नाती तोडायची हे भाजपचे संस्कार असलीत आमचे नाहीत असेही सुळे म्हणाल्या.