>> नीलिमा प्रधान
मेष – मनावर दडपण राहील
कर्केत बुध वक्री, कन्येत शुक्र. चंद्र, गुरू लाभयोग, क्षेत्र कोणतेही असले तरी जुने अनुभव लक्षात घेऊन नम्रतेने कामे करावी लागतील. नातेसंबंध, मैत्रीमध्ये कटुता निर्माण होईल. धंद्यात वसुलीचा प्रयत्न करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सम्स्या सोडवण्याचा प्रयत्न करा. प्रकरण ताणून धरणे योग्य ठऱणार नाही. कायदा पाळा. मनावर दडपण राहील
वृषभ -कामांना गती मिळेल
कर्केत बुध वक्री, कन्येत शुक्र. बुध, मंगळ लाभयोग. अनेक कामांना गती मिळेल. ओsळखी वाढतील. आत्मविश्वास, उत्साह प्रेरणादायक ठरेल. साहित्य, कला याला नवा विषय मिळेल. स्पर्धेत पुढे राहाल. नोकरीत प्रभाव राहील. धंद्यात लाभ होईल. धावपळ, प्रवासात घाई नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नवे डावपेच ठरवता येतील.
शुभ दिनांक – 18, 21
मिथुन – संयम बाळगा
कर्केत बुध वक्री, कन्येत शुक्र. यशाच्या मार्गावर जाण्यासाठी मेहनतीची व संयमाची आवश्यकता आहे. नोकरीत प्रशंसा, वर्चस्व राहील. धंद्यात लाभ होईल. वाद टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रभावी मुद्दे तयार करता येतील. कठीण, किचकट कामे करून घ्या. अनेकांचे सहकार्य मिळेल. योग्य व्यक्तीचा सल्ला कामांना उपयुक्त ठरेल.
शुभ दिनांक – 21, 23
कर्क – यश खेचता येईल
स्वराशीत बुध वक्री, कन्येत शुक्र. चंद्र, गुरू लाभयोग. कुणाला गृहीत धरू नका. यश खेचता येईल. जिद्द ठेवा. अहंकार नको. नोकरीत नम्रतेनेच यश मिळेल. रागावर ताबा ठेवा. फसगत टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठ आश्वासन देतील. कार्याला गतिमान कराल. कौटुंबिक वाटाघाटीत यश मिळेल. वडील माणसे दिशादर्शक सल्ला देतील.
शुभ दिनांक – 18, 19
सिंह – शब्द जपून वापरा
कर्केत बुध वक्री, कन्येत शुक्र. सूर्य, प्लुटो षडाष्टक योग. मनाला धक्के देणारे प्रसंग घडतील. शब्द जपून वापरा. राजकारणात शत्रू, मित्र ओळखणे कठीण असते. कायदा पाळा. नोकरीत प्रभाव राहील. व्याप वाढेल. धंद्यात फसगत टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात संमिश्र स्वरूपाच्या घटना घडतील. प्रतिष्ठा जपता येईल.
शुभ दिनांक – 20, 24
कन्या – तटस्थ भूमिका योग्य ठरेल
कर्केत बुध वक्री, कन्येत शुक्र. सूर्य नेपच्युन षडाष्टक योग. सहनशक्तीच्या बाहेर काही घटना घडतील. अहंकाराला ठेच पोहोचेल. सहनशीलता ठेवा. अडचणी तात्पुरत्या असतील. नोकरीत कठीण प्रश्न निर्माण होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात निरीक्षण करा. तटस्थ भूमिका योग्य ठरेल. दिशाहीन वक्तव्य नको. प्रकृतीची काळजी घ्या.
शुभ दिनांक – 18, 19
तूळ – सावध रहा
कर्केत बुध वक्री, कन्येत शुक्र. सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. प्रतिष्ठेचा प्रश्न केल्यास मनावर दडपण येईल. नोकरीत प्रभाव वाढेल. काम वाढेल. धंद्यात लाभ होईल. कठोर शब्द नको. फसगत टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधक तुमची गरज ओळखून फासा टाकण्याचा प्रयत्न करतील. सावध रहा. निर्णयात स्थिर रहा. प्रतिष्ठा वाचवता येईल.
शुभ दिनांक – 20, 21
वृश्चिक – चर्चेत यश मिळेल
कर्केत बुध वक्री, कन्येत शुक्र. बुध, मंगळ लाभयोग. दुसऱयांचे डावपेच ओळखता आल्याने अनेक समस्या सोडवण्यात सुलभता होईल. नोकरीत चातुर्य, तत्परता दाखवाल. धंद्यात चर्चेत यश मिळेल. मैत्रीतून लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधकांना शह देऊन स्वतची दिशा ठरवाल. अनेक दिग्गज व्यक्ती साहाय्य करतील.
शुभ दिनांक – 18, 19
धनु – कामाची प्रशंसा होईल
कर्केत बुध वक्री, कन्येत शुक्र. किरकोळ वाटणारे शब्दसुद्धा तणाव निर्माण करू शकतात. नोकरीत वर्चस्व राहील. कामाची प्रशंसा होईल. धंद्यात करार नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील. वरिष्ठांसमवेत चर्चा जपून करा. मैत्रीचे संबंध नव्याने प्रस्थापित करता येतील. प्रतिष्ठा, लोकप्रियता वाढेल. कठीण कामे करा.
शुभ दिनांक – 18, 20
मकर – दगदग होईल
कर्केत बुध वक्री, कन्येत शुक्र. भावनेच्या आहारी जाऊन कोणतेही वचन देऊ नका. प्रतिष्ठा पणाला लावणे योग्य ठरणार नाही. प्रत्येक दिवस आत्मविश्वास देणारा ठरेल. नम्रता ठेवा. नोकरीत दगदग होईल. धंद्यात लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जपून रहा. तुमच्याकडून अनेकांच्या अपेक्षा आहेत. तारतम्य ठेवा. प्रतिष्ठा जपा.
शुभ दिनांक – 20, 21
कुंभ -सावध भूमिका घ्या
कर्केत बुध वक्री, कन्येत शुक्र. साडेसाती सुरू आहे. अनेक प्रश्न तयार होतील. तारेवरची कसरत करावी लागेल. नोकरीत पत राहील. शब्द गैरसमज निर्माण करतील. धंद्यात सावध भूमिका घ्या. ठोस निर्णय घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कायदा पाळून बोला. जवळच्या व्यक्ती टीका करतील. गैरसमज होतील. प्रतिष्ठा राहील.
शुभ दिनांक – 20, 21
मीन – कामात चूक होईल
कर्केत बुध वक्री, कन्येत शुक्र. मानसिक, शारीरिक तणाव, दबाव जाणवेल. प्रकृतीची काळजी घ्या. गैरसमज पसरवले जातील. नोकरीच्या कामात चूक होईल. धंद्यात हिशेब सांभाळा. आळसाने नुकसान होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात यश दूर जात आहे असे वाटेल. स्पर्धा कठीण आहे. वरिष्ठांना दुखवू नका. घरगुती खर्च, चिंता तात्पुरती आहे हे लक्षात ठेवा
शुभ दिनांक – 18, 24