आयपीएलच्या महालिलावाबाबत संघ मालकांमध्ये मतभेद असले तरी सर्वांचा सन्मान राखत लिलाव होणारच, अशी भूमिका बीसीसीआय सचिव जय शहा यांनी मांडली आहे. मात्र ही लिलाव प्रक्रिया कधी होणार, याबाबत बीसीसीआय आपला निर्णय लवकरच जाहीर करील, असे संकेतही त्यांनी दिले.
सध्या आयपीएलच्या लिलावाबाबत दोन प्रवाह आहेत. बलाढ्य संघांना लिलाव नकोय तर कमपुवत संघांना तो हवाय. त्यामुळे महालिलावाबाबत असलेले मतभेद उघडपणे जगजाहीर झाले आहेत. याबाबत बीसीसीआयने बहुमत आणि अल्पमत या दोन्ही विचारांच्या संघमालकांना समान महत्त्व देणार असल्याची माहिती समोर आलीय. एका अहवालानुसार बीसीसीआयने सर्व संघमालकांची मते जाणून घेतली आहेत.