हिंदुस्थानी अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने देशातील सर्वात लहान रॉकेट एसएसएलव्ही-डी 3 वर श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून पृथ्वी निरीक्षण उपग्रह – 8 (ईओएस-08) प्रक्षेपित केले.
हा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेबाहेर जवळपास 475 किमी अंतरावर स्थापित केला जाणार आहे. हा उपग्रह त्या ठिकाणी एक वर्ष काम करणार आहे. या उपग्रहाचा उद्देश पर्यावरण आणि आपत्तीबाबत अचूक माहिती देणे हा आहे.