
धरणाच्या काठावर उभं राहून स्टंट करणं एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे. नागपूर जिल्ह्यातील उमरेड शहराजवळील मकरधोकडा धरणावर गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. यावेळी दोघांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला. दरम्यान, घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
गुरुवारी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्त सुट्टी असल्याने उमरेड शहराजवळील मकरधोकडा धरणावर पर्यटकांची मोठी गर्दी जमली होती. मयत तरुणही धरणावर सुट्टीची मजा घ्यायला आला होता. यावेळी तो धरणाच्या काठावर उभा राहून स्टंट करण्याचा प्रयत्न करत होता.
View this post on Instagram
दोन तरुणांनी त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला. एकाने त्याला खाली उतरण्यासाठी हातही पुढे केला. मात्र तरुणाने मदत नाकारली. याचदरम्यान त्याचा तोल गेला आणि तो धरणात पडला आणि बुडून त्याचा मृत्यू झाला. तसेच त्याला वाचवण्यासाठी गेलेले तरुणही पाण्यामुळे भिंतीवरुन खाली सरकले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.