Assembly Election – कलम 370 हटविल्यानंतर पहिल्यांदाच जम्मू कश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक, तीन टप्प्यात होणार मतदान

कलम 370 हटविल्यानंतर पहिल्यांदा जम्मू कश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. ही निवडणूक तीन टप्प्यात होणार आहे. 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरला जम्मू कश्मरमध्ये मतदान होणार आहे. जम्मू कश्मीरसोबत हरयाणामध्ये 1 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. या दोन्ही राज्यात 4 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

जम्मू काश्मीरमध्ये तीन टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडणार असून 12 ऑगस्टपासून निवडणूक कार्यक्रम सुरू होईल. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची अधिसूचना 12 ऑगस्ट रोजी निघेल 18 सप्टेंबरला पहिल्या टप्प्यांत, 25  सप्टेंबरला दुसऱ्या टप्प्यात तर, 1 ऑक्टोबरला तिसऱ्या टप्प्यात मतदान पार पडेल. पहिला टप्पा 18 सप्टेंबरला होणार असून यात 24 मतदारसंघात त्यानंतर 25 सप्टेंबरला 26 मतदारसंघात व 1 ऑक्टोबरला 40 मतदारसंघात अशा एकूण 90 मतदारसंघात मतदान होणार आहे. याआधी तब्बल दहा वर्षांपूर्वी 2014 मध्ये जम्मू कश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक झााली होती. तेव्हा 83 मतदारसंघ होते. यंदा यात सात मतदारसंघांची वाढ झाली आहे.

हरियाणात सध्या 2 कोटींहून अधिक मतदार असून राज्याची मतदार यादी 27 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. हरियाणात 1 ऑक्टोबरला मतदान प्रक्रिया होऊन 4 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.