आजचा दिवस हा संविधानाची मूल्ये जोपासण्याचा, देशाप्रति आपल्या कर्तव्याची जाणीव करून देणारा आहे. बांगलादेशात जे घडतेय त्यातून स्वातंत्र्याची किंमत काय असते हे लक्षात येते, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले.
दिल्लीमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलताना सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, आपण 1950 मध्ये संविधान स्वीकारले. मात्र शेजारी राष्ट्रात स्वातंत्र्य अनिश्चित होते, त्याचा परिणाम काय झाला, हे आपण बांगलादेशमध्ये पाहू शकतो. याच्यातून स्वातंत्र्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. स्वातंत्र्याला गृहीत धरणे खूप सोपे असते. परंतु या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत, हे भूतकाळातील प्रसंगावरून ओळखले पाहिजे.
स्वातंत्र्यलढय़ात देशाला काय सामोरे जावे लागले त्यावेळी संविधान आणि कायद्याची स्थिती काय होती, हे सर्वांना माहीत आहे. कायद्याची प्रॅक्टिस सोडून स्वातंत्र्यलढय़ात सामील झाले त्या स्वातंत्र्यसैनिकांना आपण सलाम केला पाहिज, असे चंद्रचूड म्हणाले.
n न्यायालयाचे काम सामान्य माणसाच्या जीवनाइतकेच संघर्षाने भरलेले आहे. न्याय दरबारात सर्व धर्म, जाती, लिंग, खेडेगावातील लोक येतात. या सर्वांना निवडक संसाधनांमध्ये आणि कार्यक्षेत्रात न्याय द्यावा लागेल. एवढं सोपं काम नाही, असे चंद्रचूड म्हणाले.