
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार आणि अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरीस या माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर भारी पडत असल्याचे चित्र आहे. त्यांना देशभरातून प्रचंड पाठिंबा मिळत असल्याने आणि त्यांची लोकप्रियता वाढल्याने डेमोक्रेटिक पक्षाची हवा निर्माण झाली आहे. मतदार ट्रम्प यांच्यापासून दुरावल्यामुळे त्यांची लोकप्रियता घटत चालल्याचे समोर आले आहे.
पेंसिल्वेनियासारख्या महत्वाच्या ठिकाणी कमला हॅरीस यांची लोकप्रियता 3 टक्क्यांनी वाढली असून ट्रम्प यांच्या लोकप्रियतेत केवळ 0.2 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसत आहे. राष्ट्राध्यक्षपदी निवड होण्यासाठी कमीत कमी 270 इलेक्ट्रोरल व्होट जिंकण्याची गरज आहे. बेरोजगारीचा दर सातत्याने तिस्रया महिन्यात वाढून तो 4.3 टक्क्यांपर्यंत पोहोचला असूनही सर्वेक्षणात सर्वाधिक पाठिंबा कमला हॅरीस यांनाच दिसत असून हॅरीस अर्थव्यवस्थेतील व्यवस्थापनासाठी ट्रम्प यांच्यापेक्षाही सरस असल्याचे 42 टक्के मतदारांचे म्हणणे आहे.
अर्थव्यवस्थेतील लोकांचीही पसंती
अमेरिकी अर्थवस्थेतील लोकांचा ट्रम्प यांच्या तुलनेत हॅरिस यांच्यावर जास्त विश्वास आहे. फायनान्शियल टाइम्स आणि मिशिगन विद्यापीठाने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली. 42 टक्के मतदार आर्थिक मुद्यांवर हॅरिस यांच्यावर विश्वास ठेवतात. तर ट्रम्प यांच्यावर 41 टक्के लोकांनी विश्वास ठेवला. ट्रम्प यांच्यापेक्षा 1 टक्का जास्त आहे. 5 नोव्हेंबर रोजी होणाऱया राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पार्टीच्या उमेदवार कमला हॅरिस सहभागी झाल्यापासून माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी वाढल्या आहेत.