आम्ही ‘एक-दुजे के लिए’ नव्हतोच! हनीमूनला गेल्यावर रेखाला उमगले, तेव्हाच घेणार होती घटस्फोट

हिंदी सिनेमासृष्टीतील सदाबहार अभिनेत्री रेखा तिच्या व्यावसायिक आयुष्यात यशस्वी झाली. मात्र खासगी जीवनात तिला खरे प्रेम मिळाले नाही. तिने ज्याच्या सोबत लग्न केले त्याने आत्महत्या केली. त्यानंतर जेव्हा तिचे प्रेम जडले त्यावेळी सासुने नाकारले. दरम्यान महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबतचे तिचे नाते चर्चेत होते. मात्र तेही अपूर्ण राहिले. काही दिवसांपूर्वी रेखाने हनीमून आणि तिच्या नवऱ्याशी संबंधित एक किस्सा शेअर केला होता.

रेखाने 4 मार्च 1990 मध्ये उद्योजक मुकेश अग्रवाल यांच्यासोबत लग्न केले होते. मात्र लग्नाच्या अवघ्या सहा महिन्याच्या आत मुकेश यांनी आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूच्यावेळी रेखा हजर नव्हती. त्यांच्या मृत्यूनंतर रेखाने त्यांच्याविषयीचे अनेक खुलासे केले होते. पतीच्या मृत्यूनंतर तिच्यावर अनेक गंभीर आरोप लावण्यात आले होते. त्यांच्या सासुने मुकेशच्या आत्महत्येमागे रेखाला जबाबदार धरले होते. तो काळ त्यांच्यासाठी फार कठीण आणि वेदनादायी होता. दरम्यान, पतीच्या मृत्यूनंतर रेखाने धक्कादायक खुलासा केला होता. मुकेश एका मानसिक आजाराचा सामना करत होता. त्यांनी याबाबत अनेक महिन्यानंतर खुलासा केला होता, असे रेखा म्हणाली.

मुकेशसोबत घटस्फोट घेऊ इच्छित नव्हती. मात्र त्याला घटस्फोट हवा होता. मुकेशने आपल्याकडे घटस्फोट मागितला होता. रेखा आपल्यापासून दूर व्हावी, असे मुकेशना कधीच वाटत नव्हते. शुटींगच्यानिमित्ताने अनेक दिवस बाहेर राहावे लागत होते. ते मुकेश यांना खटकत होते. आपण अभिनयापासून दूर राहावे, अशी त्यांची इच्छा होती. मात्र आपण त्यांच्यापुढे एक अट ठेवली होती. गर्भवती राहिले तर ती अभिनय सोडून देईन, असे रेखाने एका मुलाखतीत सांगितले.

रेखाने आपल्या नात्याबाबतही सांगितले. अरेंज मॅरेजसाठी एवढी घाई चांगली नव्हती. मात्र तरीही आपल्या नात्यात कधी हार मानली नाही. लग्नानंतर मुकेश यांच्यासोबत हनीमुनला गेली होती. त्यावेळी तिला लक्षात आले की ते दोघं एकमेकांसाठी बनलेले नाहीत. तेव्हाच विभक्त व्हायला हवे होते, असे आपल्याला त्यावेळी वाटल्याचे रेखाने म्हटले.

मीडिया वृत्तांनुसार, रेखाने तिच्या आयुष्यात दोनदा लग्न केले होते. आधी विनोद मेहरा यांच्याशी आणि नंतर मुकेश अग्रवाल यांच्याशी केले होते. विनोद मेहरा यांच्या आईला रेखा पसंत नव्हती. त्यामुळे त्यांचे ते नाते अपूर्ण राहिले. दरम्यान, रेखाने विनोद मेहरा यांच्यासोबत लग्न केल्याच्या बातम्यांना 2004 मध्ये नाकारले होते आणि त्या नात्याला मैत्रीचे नाव दिले होते. त्यानंतर त्यांनी मुकेश यांच्यासोबत लग्न केले होते. मात्र अवघ्या सहा महिन्यात त्यांचे नाते तुटले. ज्यानंतर त्यांनी पुन्हा लग्न केले नाही.