स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आरिफ (नसीम) खान यांनी चांदिवली विधानसभा मतदारसंघात तिरंगा गौरव यात्रेचे आयोजन केले होते. या यात्रेमध्ये शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड सहभागी झाले होते.