मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करूनही झेंडा फडकेच ना, अखेर…; बघा काय घडलं…

मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण करण्यात आले. पण ध्वजारोहणावेळी उपस्थित असलेले बहुतेकजण काही क्षण गोंधळात पडले होते. याचं कारण म्हणजे ध्वज असा काही बांधला होता की तो फडकेच ना. त्या ध्वजाला रस्सीची गाठ पडल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी रस्सी खेचूनही तो फडकतच नव्हता. मुख्यमंत्री जवळपास 30 सेकंद झेंडा फडकवू शकले नाहीत.

देशात आणि राज्यात 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना मुंबईतही मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि इतर कर्मचारीही उपस्थित होते. पण झेंडा फडकवण्याच्या वेळी मुख्यमंत्र्यांना जवळपास 30 सेकंद प्रयत्न करावा लागला. रस्सीला गाठ पडल्याने रस्सी खेचूनही झेंडा फडकला नाही. हे पाहून अखेर जवळ उभ्या असलेल्या जवानाने रस्सीला जोरदार झटका दिला. त्यानंतर जवानाने रस्सी मुख्यमंत्र्यांच्या हातात दिली आणि झेंडा फडकला. राष्ट्रध्वज फडकल्यानंतर राष्ट्रगीत झालं. मुख्यमंत्र्यांचा झेंडा फडकवतानाचा व्हिडिओही समोर आला आहे. पाहा व्हिडिओ…