जम्मू-कश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी; एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी

जम्मू-कश्मीरमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्यान गुरूवारी पावसाचा जोर इतका वाढला की, कुलगाम जिल्ह्यात ढगफुटी झाली. या ढगफुटीमुळे एकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

अचानक ओढवलेल्या या परिस्थितीमुळे भीतीचे वाचावरण तयार झाले आहे. ढगफुटीनंतर स्थानिक अधिकाऱ्यांनी परिसरात शोध आणि बचाव कार्य सुरू केले आहे. मुख्तार अहमद चौहान असे मृताचे नाव असून तीन जखमींपैकी एकाचे नाव रफाकत अहमद चौहान असे आहे.

महिन्याच्या सुरुवातीलाच जम्मू-कश्मीरमधील गांदरबल जिह्यातील पंगन भागात ढगफुटी झाली होती. ढगफुटीमुळे अचानक पूर आला. यात अनेक घरांचे आणि वाहनांचे नुकसान झाले होते. त्यामुळे श्रीनगर- लेह राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला होता.