स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील 59 पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदकाचे गिफ्ट मिळाले. केंद्रीय गृह विभागाकडून आज राष्ट्रपती पोलीस पदकांची घोषणा झाली असून देशातील 908 पोलिसांना हा बहुमान मिळाला आहे. महाराष्ट्रातील तिघा वरिष्ठ अधिकाऱ्यांना उल्लेखनीय सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, 17 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’, 39 पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ‘पोलीस पदक’ जाहीर झाले आहे.
पोलीस सेवेतील उल्लेखनीय, गुणवत्तापूर्ण कामगिरीबरोबर शौर्य गाजविणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पोलीस पदके जाहीर करण्यात आली. देशभरातील एकूण 908 पोलिसांना ‘पोलीस पदके’ जाहीर करण्यात आली असून यामध्ये महाराष्ट्रातील 59 पोलिसांचा समावेश आहे.
विशिष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलीस पदकः अप्पर महासंचालक चिरंजीव प्रसाद, संचालक राजेंद्र डहाळे, सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर.
17 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’
उपविभागीय अधिकारी- डॉ. कुणाल सोनवणे, उपनिरीक्षक दीपक आवटे, धनाजी होनमाने, अंमलदार नागेशकुमार माडरबोईना, शकील शेख, विश्वनाथ पेंडाम, विवेक नरोटे, मोरेश्वर पोटावी, पैलाश कुलमेथे, कोठला कोरामी, कोरके वेलादी, महादेव वानखडे, अपर पोलीस अधीक्षक-अनुज तारे, उपनिरीक्षक राहुल देव्हाडे, विजय सपकाळ, अंमलदार महेश मिच्छा, समय्या असाम.
गुणवत्तापूर्ण सेवेसाठी 39 पोलिसांना ‘पोलीस पदक’
उपमहानिरीक्षक – दत्तात्रय शिंदे, संदीप दिवाण, पोलीस उपअधीक्षक -शिवाजी फडतरे, पोलीस अधीक्षक- संजय खांदे, पोलीस उपअधीक्षक विनीत चौधरी, उपनिरीक्षक प्रकाश गायकवाड, पोलीस निरीक्षक सदानंद राणे, सहाय्यक आयुक्त विजय हातिसकर, उपअधीक्षक महेश तराडे, निरीक्षक राजेश भागवत, उपनिरीक्षक गजानन तेंडुलकर, राजेंद्र पाटील, संजय राणे, गोविंद शेवाळे, मधुकर नेताम, पोलीस निरीक्षक अशोक होनमाने, उपनिरीक्षक शशिकांत तटकरे, अक्षयवरनाथ शुक्ला, शिवाजी जुनदारे, सहायक उपनिरीक्षक सुनील हांडे, उपनिरीक्षक प्रकाश देशमुख, सहायक उपनिरीक्षक दत्तू खुळे, निरीक्षक रामदास पालशेतकर, सहाय्यक उपनिरीक्षक देविदास वाघ, प्रकाश वाघमारे, संजय पाटील, मोनिका थोमास, अंमलदार बंडू ठाकरे, गणेश भामरे, अरुण खैरे, दीपक टिल्लू, राजेश पैदलवार, असिस्टंट कमांडंट श्रीकृष्ण शिरपूरकर, निरीक्षक राजू सुर्वे, संजीव धुमाळ, सहायक उपनिरीक्षक अनिल काळे, मोहन निखारे, द्वारकादास भांगे, अमितकुमार पांडे.