लोकसंख्येत हिंदुस्थान जगात नंबर वनवर आहे. लोकसंख्येत चीनलाही मागे टाकले आहे. परंतु आता सरकारी आकडेवारीनुसार, 2036 पर्यंत हिंदुस्थानची लोकसंख्या 152.2 कोटींपर्यंत पोहोचू शकते, असे सांख्यिकी आणि कार्यक्रम मंत्रालयाने आपल्या अहवालात म्हटले आहे. पुढील 12 वर्षांत हिंदुस्थान 150 कोटींचा टप्पा पार करेल, असे सरकारी आकडेवारीचा अंदाज आहे. लिंग गुणोत्तरमध्ये पुढील काळात 1 हजार पुरुषांमागे 952 महिला असतील. 2011 च्या जनगणनेत 1 हजार पुरुषांमागे 943 महिला होत्या.