नववीत शिकणाऱ्या मुलाकडून तीन वर्षीय मुलीवर बलात्कार, मुंबईतली धक्कादायक घटना

नववीत शिकणाऱ्या एका मुलाने तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला आहे. मुंबईत ही धक्कादायक घटना घडली आहे.

मुंबईतल्या साकीनाकामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. एका नववीत शिकणाऱ्या मुलाने तीन वर्षीय मुलीवर बलात्कार केला आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात पोक्सो अंतर्गत कारवाई केली आहे.