बिग बॉसच्या घरात तुफान राडा सुरू आहे. घरातील सगळेच सदस्य एका पेक्षा एक आहेत. पहिल्या आठवड्यापासूनच निक्की आणि जान्हवीने घर डोक्यावर घेतले आहे. पहिल्या दिवसापासूनच निक्कीने अभिनेत्री वर्षा उसगांवकरांवर निशाणा साधला आहे. तिच्या या वक्तव्यावरून मराठी कलाकारांनी निक्कीला सुनावले होते. यानंतर भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख यांनी निक्कीला वर्षा उसगांवकरांची माफी मागायला सांगितली होती. मात्र पुन्हा एकदा निक्कीच्या वक्तव्यावरून खळबळ उडाली आहे.
बिग बॉसच्या घरात तिसऱ्या आठवड्यात पहिल्यांदाच दोन चिमुकल्या पाहुण्यांची एन्ट्री झाली. यावेळी त्यांना दोन छोट्या पाहुण्यांना सांभाळण्याचा टास्क दिला होता. मात्र तेव्हाही दोन गटांमध्ये राडा झाला. टास्क सुरू असताना निक्कीने टीम B च्या सदस्यांच्या बाहुलीचा एक पाय तोडला. त्यामुळे वर्षा उसगांवकर यांनी, “निक्की बाहुलीची मुंडी काय, तंगडंही तोडेल” असे म्हटले. यावर उत्तर देताना निक्की म्हणते, “यांच्या भावना बघितल्या का? आईचं प्रेम कसं समजेल जाऊ देत…” असं निक्का यावेळी म्हणाली.
View this post on Instagram
निक्कीने वर्षा उसगांवकरांवर केलेल्या मातृत्वाच्या वक्तव्यावर पुन्हा एकदा नेटकरी संतापले आहेत. सोबत मराठी कलाकारांनीही या वक्तव्याचा निषेध केला आहे. दरम्यान अभिनेत्री अनघा अतुलनेही निक्की आणि जान्हवीला धारेवर धरले आहे. अनघा अतुलने थेट बिग बॉस मराठीच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्रीची मागणी केली आहे. अनघाने आपल्या सोशल मीडियावर एक स्टोरी शेअर केली आहे. बिग बॉस एक विनंती आहे, एक दिवस तरी मला वाइल्ड कार्ड एन्ट्री द्या. बाईSSS आणि बुगू बुगू च्या श्रीमुखात लगावायची आहे, असे तिने म्हटले आहे.