लोकसभा निवडणुकीत बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवारांना उमेदवारी देऊन आम्ही मोठी चूक केली. राजकारण हे पार घरामध्ये शिरू द्यायचे नसते, पण त्याबाबतीत माझ्याकडून काहीशी चूक झाली, अशी स्पष्ट कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
पार्लमेंट्री बोर्डाकडून बारामतीमधून सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला होता. बाण एकदा सुटला की तो माघारी घेता येत नाही. मात्र आज मला माझ मन सांगते की, तसे व्हायला नको होते, असे ते म्हणाले.