लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृतीदिनानिमित महाआरोग्य शिबीराचे आयोजन

माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून दिनांक14 ऑगस्ट रोजी लातूर मेडिकल असोसिएशन, डेंटल असोसिएशन, निमा असोसिएशन तसेच विलासराव देशमुख फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे . या महाआरोग्य शिबिराचे हे 12 वर्ष आहे. अशी माहिती पञकार परिषदेत देण्यात आली.

या पञकार परिषदेस डॉ.कल्याण बरमदे, डॉ.अशोक पोतदार, डॉ. दिनेश नवगीरे, डॉ. उमेश कानडे, डॉ.गणेश बंदखडके आमदार अमित देशमुख,यांच्या सह अन्य मान्यवर उपस्थित होते. दिवंगत विलासराव देशमुख यांच्या स्मृती दिनानिमित्त 12 वर्षापासून जिल्हयातील किमान 260 ते 270 विविध हॉस्पिटलच्या माध्यमातून महाआरोग्य शिबिर चालू आहे. सन 2023 महाआरोग्य शिबिरात तब्बल 15 हजारांहून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली होती. या महाआरोग्य शिबिराचे हे12 वे वर्ष आहे यावर्षीही जवळपास 256 हॉस्पिटलच्या माध्यमातून हे महाआरोग्य शिबीर पार पडणार आहे.

यावर्षीच्या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातूनही पंधरा हजारां पेक्षाही अधिक गरजू रुग्णांना मोफत तपासणी, उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आवश्यक त्या प्रमाणात मोफत औषधीही उपलब्ध करून देण्यासाठी वैद्यकीय संघटना प्रयत्नशील आहेत अशी माहिती लातूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. उमेश कामते सचिव गणेश बंदखडके , डॉ. नवगिरे दिनेश, डॉ. कल्याण बरमदे डॉ अशोक पोतदार यांनी दिली